Old school Swatch Watches

मित्र म्हणतात
झाले गेले
विसर सगळे
चालायला फक्त
ओसाड रस्तेच आपले

तिची वाटच वेगळी रे
हिरव्यागार रानातली
आपण फक्त आठवायची
मनात जी जपलेली

अरे पण कसा विसरु मी
रोजचे ते बोलणे
गोड तो चेहरा आणि
तिचे ते हसणे

कसा मी विसरु
स्वप्नांचे ते महाल
अरे उध्वस्त कर सारे
आपला तो फक्त उजाड माळ

सहजच ती बोलुन जायची
तुझ्याच मनाचे सारे खेळ
कळुन चुकले सारे तुला
निघुन गेली जेव्हा वेळ

नको रडुस आता
सावर रे स्वत:ला
नशीबाचा डाव सारा
का कोसतोस स्वत:ला

कळतयं रे सगळं
तरी कळतच नाही काही
खुप जगायंच आहे रे
पण जगायला आता कारणच नाही

तिच्यात जग होतं माझे
पण तिच्यासाठी मी नगण्यच
हिशोब दोन पावसाळ्यांचा
बाकी मात्र शुन्यच...........