आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..
आठवण आली तुझी की,
9माझं मन कासाविस होतं
मनात घोळवावं लागतं..
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य…
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य…
पण तरिही………
आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी….
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी….
**************************************************
कधी कधी माझं मन मला खायला उठतं,
मी तिला असं दुःखवायला नको होतं…
हां, झालं असेल काही उलटं सुलटं,
कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!
मी कधी याचा विचारच का केला नाही?
आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??
पण तरीही ती माझीच होती,
कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!
झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,
पण कुणी?, मी नाही म्हटलं… तिनं तरी??
तिला काय वाटत असेल आत्ता?
जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का…?
शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक …पण,
मी काय करू? काय नको ? …असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?
मी काहीच बोललो नाही.
बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..
बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,
पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!
शेवटचा निर्णय तिचाच होता ,
त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,
दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..
मी तिला असं दुःखवायला नको होतं…
मी तिला असं दुःखवायला नको होतं…….
__________________________________________________
-------------------------------------------------
गंध आवडला फुलाचा म्हणून......................
गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...
मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं
अशावेळी....
आणि अशाच वेळी
-------------------------------------------------
मैत्री म्हणजे.......खांद्यावर हात
मैत्री म्हणजे.......सदैव साथ
मैत्री म्हणजे.......वाट पाहणे
मैत्री म्हणजे.......सोबत राहणे
मैत्री म्हणजे........एकत्र फिरायला जाणे
मैत्री म्हणजे........एकत्र आईस्क्रीम खाणे
मैत्री म्हणजे........सल्ले घेणे
मैत्री म्हणजे........मार्ग देणे
मैत्री म्हणजे........कधी राग
मैत्री म्हणजे........कधी भडकते आग
मैत्री म्हणजे........कधी खरी कधी खोटी
मैत्री म्हणजे........कधी पड़ते छोटी
मैत्री म्हणजे........आजचं सत्य
मैत्री म्हणजे........नसेलच नित्य
मैत्री म्हणजे........लिहावं तेवढं कमी
मैत्री म्हणजे........सुखातच साथीची हमी
-----------------------------------------------------
-------------------------------------------------------
मैत्री म्हणजे काय असत?
एकमेकांचा विश्वास असतो?
अतूट बंधन असत? की
हसता खेळता सहवास असतो?
मैत्री म्हणजे मैत्री असते,
व्याख्या नाही तिच्यासाठी;
अतूट बंधन नसत,
त्या असतात रेशीमगाठी
मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी;
मैत्री करावी सोन्यासारखी,
तावुन-सुलासुलाखून चमचमणा;
मैत्री करावी हिर्या सारखी,
पैलू पडताच लख-लखणारी;
मैत्री असावी पहाडासारखी,
-----------------------------------------------------
मैत्रीण
एक तरी मैत्रीण अशी हवी
जरी न बघता पुढे गेलो तरी
मागून आवाज देणारी
आपल्यासाठी हसणारी
वेळ आलीच तर अश्रुही पुसणारी
स्वतःच्या घासातला घास
आठवणीने काढून ठेवणारी
वेळप्रसंगी आपल्या वेडया मित्राची
समजूत काढणारी
वाकडं पाऊल पडताना मात्र
मुस्काटात मारणारी
यशाच्या शिखरांवर
आपली पाठ थोपटणारी
सगळ्यांच्या गलक्यात
आपणास सैरभैर शोधणारी
आपल्या आठवणीनं
आपण नसताना व्याकूळ होणारी
खरचं! अशी एक तरी जीवा भावाची
'मैत्रीण' हवी जी आपणास मित्र म्हणवणारी
-----------------------------------------------------
गगनाला भिडणारी;
मैत्री असावी समुद्रासारखी,
तलाचा थान्ग नसणारी;
मैत्री म्हणजे समिधा असते,
जीवन यद्न्यात अर्पण झालेली;
स्वताच्या असन्याने सुद्धा
मन पवित्र करणारी;
मैत्री हे नाव दिलय
मनाच्या नात्यासाठी;
अतूट बंधन नसत त्या असतात ...
रेशीमगाठी ...
-----------------------------------------------------
अचानक कधीतरी...."
सुखाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलायचं
प्रेमाच्या वर्षावाने, न्हाऊन निघायचं,
काळजी, द्वेष, सारं फेकुन द्यायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.
आपलं अस्तित्व या दुनियेत पहायचं,
आपलं महत्वं कुठे आहे का, हे सतत शोधायचं,
आपल्या प्रियजनांना नेहमीच जपायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.
आपलं सारं कही, क्षणात दुसर्याला द्यायचं
एकदा दिल्यावर मात्र परत नाही मागायचं,
गोड आठवणींना, मनात आपल्या साठवायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.
पण? पण अजून मला बरंच काही पहायचंय
या दुनियेकडुन, खूप काही शिकायचयं,
इथे, मलाही काहीतरी बनायचयं
म्हणून मला अजून, भरपूर जगायचं ....भरपूर जगायचं .....भरपूर जगायचं .....
-----------------------------------------------------